महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य

महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे पाच प्रमुख प्रकार आहेत -

*१) महानगरपालिका*
*२) नगरपरिषद*
*३) नगरपंचायत*
*४) औद्योगिक नगर वसाहत प्राधिकरण*
*५) कटक मंडळ*

*१) महानगरपालिका -*
•नागरी प्रशासन व्यवस्थेतील सर्वोच्च पातळीवरील रचना
•महाराष्ट्रात एकूण २६ महानगरपालिका आहेत.
•सदस्यांची संख्या किमान ५५ व कमाल २२१ इतकी असते.

*लोकसंख्या महापालिका सदस्य*
•१. ३ ते ६ लाख ५५ ते ७५
•२. ६ ते १२ लाख ८५ ते ११५
•३. १२ ते २४ लाख ११५ ते १४५
•४. २४ लाखांपेक्षा जास्त १४५ ते २२१

*महानगरपालिकेचा कार्यकाल ५ वर्षे असतो.*
•महिलांसाठी ५0 टक्के आरक्षण व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २७ टक्के 

*महापौर -*
- शहराचा प्रथम नागरिक
- नगरसेवक आपल्यांपैकी एका सदस्यांची महापौर व दुसर्‍याची उपमहापौर म्हणून निवड करतात.
- कार्यकाल २१/२ वर्षे 
- महापौर आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात.
*कार्ये -*
-महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख
- महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका बोलविणे व त्यांचे अध्यक्षस्थान स्वीकारणे.

*महानगरपालिकेच्या समित्या -*
-स्थायी समिती, परिवहन समिती, नगर नियोजन समिती, प्रभाग समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, कायदा समिती

*महानगरपालिका आयुक्त -*
- महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी
- महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करणे
- महानगरपालिकेचा सचिव म्हणून
- महानगरपालिका व राज्य शासन यामध्ये दुवा.

*उत्पन्नाची साधने -*
- राज्य शासनाकडून मिळणारी अनुदाने,
- पाणीपट्टी, घरपट्टी, जकात, स्थानिक उपकर

*कार्ये -*
सार्वजनिक पाणीपुरवठा, आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे, स्वच्छता कार्यक्रमांची अंमलबजावणी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, क्रीडांगणे, उद्याने, सार्वजनिक वाचनालये स्थापन करणे.

*२) नगरपरिषद -*
•लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 'अ', 'ब' व 'क' दर्जाच्या नगरपरिषद स्थापन करण्यात आल्या आहेत.

*डोंगरी भागात थंड हवेच्या ठिकाणी नगरपरिषदा*
१) चिखलदरा, २) खुल्ताबाद ३) महाबळेश्‍वर ४) माथेरान ५) पाचगणी ६) पन्हाळा.

*लोकसंख्या वर्ग सदस्य संख्या*
१. १ लाखाहून 'अ' वर्ग ३८ सदस्य आणि १ अधिक लाखाहून अधिक असलेल्या प्रत्येक ८ हजारासाठी १ सदस्य,,
•२. ४0 हजार 'ब' २३ सदस्य आणि १ लाख वर्ग ४0 हजारपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ५ हजारासाठी १ सदस्य

•३. २५ हजार 'क' १७ सदस्य आणि २५ ते ४0 हजार वर्ग हजारपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ३ हजारासाठी १ सदस्य

*नगराध्यक्ष -*
- मतदारांकडून प्रत्यक्ष निवड
- नगराचा प्रथम नागरिक

*समित्या -*
*१) स्थायी समिती*
१) सार्वजनिक बांधकाम समिती
२) शिक्षण समिती 
३) सार्वजनिक आरोग्य तपासणी
४) पाणीपुरवठा समिती
५) नियोजन व विकास समिती 

*मुख्याधिकारी -*
- नगरपरिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी
- नगरपरिषदेचा अर्थसंकल्प तयार करतो.

*नगरपरिषदेची कार्ये -*
-पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करणे, रस्ते, पूल, बाजार, शौचालये बांधणे, रस्त्यांवर दिव्यांची व्यवस्था करणे, जन्म-मृत्यूची नोंद, अग्निशमक व्यवस्था करणे, प्राथमिक शिक्षणाची सोय करणे.

*नगरपंचायत -*
- नगरपंचायतीत सर्वसाधारणपणे ९ ते २0 सभासद असतात.
- नगरपंचायतीसाठी लोकसंख्या १0,000 हून अधिक व २५,000 पेक्षा कमी.

*अध्यक्ष व उपाध्यक्ष -*
- नगरपंचायतीच्या राजकीय प्रमुखाला अध्यक्ष व उपप्रमुखाला उपाध्यक्ष म्हणतात.
- अध्यक्षांची निवड मतदारांकडून केली जाते.

*कार्ये :-*नगरपंचायतीची बैठक बोलविणे व तिचे अध्यक्षस्थान भूषविणे
- आर्थिक व प्रशासकीय कारभारावर नियंत्रण
-नगरपंचायतींचा कार्यकाल ५ वर्षे असतो.

*कार्यकारी अधिकारी -*
- नगरपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख
- पंचायतीचा सचिव

*नगरपंचायतीची कार्ये -*
-पाणीपुरवठय़ाची सोय करणे, रस्त्यावर दिव्यांची सोय करणे, सार्वजनिक आरोग्य व स्वास्थ्य ठेवणे, विवाह, जन्म, मृत्यूची नोंद ठेवणे

*उत्पन्नाची साधने -*
-नगरपंचायतीची स्थावर मालमत्ता, परवाना फी, बांधकाम कर, पाणीपट्टी, घेतलेले कर्ज, सरकारकडून मिळणारे अनुदान.

*४) औद्योगिक नगर वसाहत प्राधिकरण -*
-७४ व्या घटनादुरुस्तीने औद्योगिक नगर वसाहत स्थापन करण्याचे अधिकार राज्य शासनाला दिले आहेत.
यामध्ये अध्यक्ष व अन्य ५ सदस्य (एकूण ६) असतात.

*५) कटक मंडळे
-राज्यात जेथे लष्करी छावण्या असतात, तेथे प्रशासकीय कारभार कटक मंडळामार्फत चालवला जातो.
लोकसंख्येच्या आधारे प्रकार

•१) प्रथम श्रेणी कटक मंडळ - १0,000 पेक्षा जास्त नागरी लोकसंख्या
•२) द्वितीय श्रेणी कटक मंडळे- २,५00 ते १0,000 नागरी लोकसंख्या
•३) तृतीय श्रेणी कटक मंडळे - २,५00 पेक्षा कमी नागरी लोकसंख्या

•प्रथम श्रेणी कटक मंडळात एकूण १५ सदस्य असतात. त्यापैकी ८ सदस्य नामनिर्देशित, तर ७ सदस्य निर्वाचित असतात.
*कार्ये -*सार्वजनिक रस्ते व दिवाबत्तीची सोय. पिण्याच्या पाण्याची सोय

Popular posts from this blog

चुंबकाचे गुणधर्म

खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

भारतातील सर्वात मोठे