ध्येय

जोपर्यंत माणूस ध्येयाकडे जाणं चालूच ठेवतो तोपर्यंत तो आनंदयात्री असतो. जीवनात सुख किंवा दु:ख येतात आणि जातात. समाधानाचे क्षण येतात तसेच निराशेचेपण येतात. मात्र प्रवास चालूच असायला हवा. हाती घेतलेलं कर्म धर्म मानायचं ही खरी परीक्षा. कालचीच गोष्ट. गौरी (माझी पत्नी) मला सांगत होती, ''महेंद्र, तुला नेमकं काय हवंय ते तू आत्तापर्यंत कधीच ठरवू शकला नाहीस. तू जशी वेळ येईल तसे तुझे उद्योग-व्यवसाय बदलत राहिलास. कोणत्याही एका व्यवसायाशी तू स्वत:ला बांधून ठेवले नाहीस. त्यामुळे यापुढील आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं आहे ते ठरवण्याची वेळ आता आली आहे. आणि अजून वेळ गेलेली नाही. तू आत्तासुद्धा हे ठरवू शकतोस.'' ती सांगत होती ते संपूर्णपणे खरं होतं. त्यात काही चुकीचं नव्हतं. तिने एक आठवण यावेळी सांगितली. त्यावेळी आमच्या विवाह संस्थेच्या माझ्या कामात सातत्य नसे. काही दिवस झाले की मला कामाचा कंटाळा येई. त्यामुळे तिची चिडचीड होणं स्वाभाविक होतं. तेव्हा आम्ही दोघं डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा ते गौरीला म्हणाले होते, ''हे बघ, ही विवाहसंस्था हे तुझं कर्म आहे आणि कर...