२०३५ पर्यंत खनिज तेल वापरात भारत सर्वोच्च स्थानी
2035 पर्यंत खनिज तेल वापरात भारत सर्वोच्च स्थानी
खनिज तेलाच्या वापराच्या बाबतीत जपानला मागे टाकत भारत जगातील तिसऱया क्रमांकाचा ग्राहक बनला आहे. 2035 पर्यंत कच्च्या तेलाच्या विक्रीच्या बाबतीत जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांत भारत पहिल्या स्थानी पोहोचेल असे बीपी या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऊर्जा क्षेत्रातील कंपनीने अहवालात म्हटले आहे.
2008 मध्ये उर्जेच्या वापराच्या बाबतीत भारत आशियात दुसऱया स्थानी होता. 2015 मध्ये भारताने जपानला मागे टाकले आणि कच्च्या तेलाच्या विक्रीमध्ये अमेरिका आणि चीननंतर तिसऱया क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे.
2035 पर्यंत सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांना मागे टाक भारतात तेलाची विक्री मोठय़ा प्रमाणात पोहोचेल. यामध्ये भारतातील उत्पादनात वाढ होण्याबरोबराचे देश आयातीवरही निर्भर राहील. भारत 2030 पर्यंत ऊर्जेच्या वापराच्या बाबतीत चीनलाही मागे टाकेल असे कंपनीच्या अहवालात म्हणण्यात आले आहे.
खनिज तेलाच्या विक्रीच्या बाबतीत 2015 मध्ये 41 लाख बॅरल प्रतिदिनावरून वाढत 2035 पर्यंत 92 लाख बॅरल प्रतिदिनावर पोहोचेल. याचप्रमाणे नैसर्गिक वायूची विक्री 4.9 अब्ज घनमीटरवरून 12.8 अब्ज घनमीटरवर पोहोचेल. कोळशाची विक्री दुप्पट वाढत 83.3 कोटी टनावर पोहोचेल असे म्हणण्यात आले .