STI पूर्वपरीक्षा स्पेशल

STI पूर्वपरीक्षा स्पेशल:- भाग:-०१
०१) नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई गाझामधील संयुक्त राष्ट्रांच्या शाळांच्या पुर्नबांधणी किती हजार डॉलर दान करणार आहे?
== ५० हजार डॉलर
०२) जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी भारत तिबेट सीमा पोलिसांनी (ITBP) किती मदत केली आहे?
== २ कोटी ९१ लाख रुपये
०३) केंद्र सरकारने गहूचा किमान हमीभाव ५० रुपयांनी वाढवून प्रति क्विंटलसाठी किती केला आहे?
== १,४५० रु.
०४) आझाद हिंद सेनेत काम केलेल्या कोणत्या जेष्ठ स्वातंत्रसैनिकाचे नुकतेच निधन झाले आहे?
== जगदीश शरण पांडे
०५) ब्रॅडमन हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले दोन क्रिकेटपटू कोण?
== सचिन तेंडूलकर आणि स्टीव वॉ
०६) केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर कोणत्या चार भारतीय भाषांमध्ये मोफत एसएमएस बातम्या ऑल इंडिया रेडियो (एआईआर) द्वारे दिल्या जाण्याची घोषणा केली आहे.ही योजना ‘डिजिटल इंडिया’चाच एक भाग आहे?
== गुजराती, आसामी, तामिळ आणि मल्याळम(या अगोदर हिंदी, मराठी, संस्कृत, डोगरी व नेपाली या भाषांत)
०७) आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस कधी साजरा केला जातो?
== २९ ऑक्टोबर( २००५ पासून)
०८) Wi-Fi सुविधा पुरविणारे देशातील पहिले रेल्वे स्थानक कोणते?(रिंगटेल कंपनीद्वारे)
== बंगळुरू Bangalore City
०९) केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकतेच कोणत्या रोगासाठी एक मिशन सुरु केले आहे?
== क्षयरोग (टीबी)-मिशन-२०२०
१०) दुबईस्थित मूळ भारतीय नेत्रचिकित्सक असलेल्या कोणत्या व्यक्तीस महात्मा गांधी प्रवासी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे?
== विनोद गाउबा
११) राष्ट्रीय सुरक्षा परिषद पुरस्कार (एनएससीआय) २०१३ पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे?
== केंद्रीय कामगार मंत्री नरेंद्र सिंग तोमर
१२) ग्राहक कॉन्फिडन्स इंडेक्स २०१४ (Nielsen Global Consumer Confidence Index) च्या तिसर्या तिमाहीत पहिल्या क्रमांकावर असणारा देश कोणता?
== भारत(१२६ अंक)
१३) ग्राहक कॉन्फिडन्स इंडेक्स २०१४ (Nielsen Global Consumer Confidence Index) च्या तिसर्या तिमाहीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर असणारा देश कोणता?
== इटली (४६ अंक)
१४) युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी (UIDAI) द्वारा जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २८ ऑक्टोबर २०१४ पर्यत किती नागरिकांना आधारकार्डाचे वाटप करण्यात आले आहे?
== ७० कोटी
१५) अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी जिनेव्हा स्थित HSBC बँकेत खाती असलेल्या ६२७ नागरिकांची यादी सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केली आहे.ही माहिती कोणत्या वर्षाशी संबंधित आहे?
== २००६(फ्रान्स सरकारने केंद्र सरकारला हा तपशील २०११ मध्ये दिला होता)
१६) परदेशी बँकांतील काळे पैसेधारकांच्या यादीच्या संदर्भात सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात कोणाचा समावेश आहे?
== न्या. रंजना प्रकाश देसाई आणि न्या. मदन लोकुर
१७) गंगेचे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांचे पाणी व वीज पुरवठा तोडण्याची कारवाई करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कोणास दिले आहे?
== राष्ट्रीय हरित लवाद
१८) 'फ्री थिंकर्स' या संस्थेतर्फे 'किसिंग ऑफ लव्ह'(केरळ) हे आंदोलन पुकारणारे लघुपट दिग्दर्शक कोण?
== राहुल पासुपालन
१९) नासाच्या व्हर्जिनिया येथे एका व्यावसायिक प्रक्षेपण तळावर अंटारेस अग्निबाण उड्डाणानंतर स्फोट होऊन कोसळला.हा प्रेक्षपाक कोणत्या खाजगी कंपनीच्या मालकीचा होता?
== ऑरबायटल सायन्सेस कॉर्पोरेशन
२०) बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढय़ात हजारो जणांच्या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपावरून विशेष लवादाने जमात-ए-इस्लामी या मूलतत्त्ववादी संघटनेचा प्रमुख असलेल्या कोणत्या व्यक्तीस फाशीची शिक्षा ठोठावली आहे?
== मतिऊर रेहमान निझामी
२१) इस्लामी छात्र या संघटनेचे रूपांतर अल-बद्र दहशतवादी संघटनेत करणारा या संघटनेचा अध्यक्ष कोण?
== मतिऊर रेहमान निझामी
२२) टाइम फॉर्मॅट पद्धतीतील जागतिक बिलियर्डसचे जेतेपद पटकाविण्याची करामत करणारा भारतीय खेळाडू कोण?
== पंकज अडवाणी
२३) एकाच वर्षात बिलियर्डसची दोन्ही विजेतीपदे जिंकण्याचा मान तीनवेळा मिळविणारा पहिलाच खेळाडू कोण?
== पंकज अडवाणी
२४) दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये हत्या झाल्यानंतर देशभरात उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या ३,३२५ व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी किती रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे?
== ५ लाख रुपये
२५) अल्पसंख्य खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आली आहे?
== अरविंद मायाराम
२६) ३१ ऑक्टोबर हा दिवस कोणत्या राष्ट्रीय नेत्याच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे?
== सरदार पटेल
२७) 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या प्रकल्पाची 'वर्क ऑर्डर' कोणत्या कंपनीला देण्यात आली आहे?
== एल अँड टी
२८) वॉरेन अँडरसन यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या कंपनीचे प्रमुख होते?
== युनियन कार्बाईड कॉर्पोरेशन
२९) सागरी जलतरणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी राबविण्यात आलेल्या "डेल्फिन्हस‘ मोहिमेचे प्रमुख कोण आहे?
== परमवीरसिंग
३०) ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सलग तीन शतके काढलेला इंग्लंडच्या हर्बर्ट सट्‌क्लि फ यांच्यानंतर पहिलाच फलंदाज कोण?
== युनूस खान
३१) मायकल साता यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते?
== झांबिया
३२) १८वे सार्क संमेलन २६-२७ नोव्हेंबर २०१४ रोजी कोठे आयोजित करण्यात आले आहे?
== नेपाळ
३३) भगिनी सराली व त्यांच्या २२ उपासकांनी भंते आर्यवांग्सो महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली जगप्रसिद्ध अजिंठा लेणींवर माहितीपट तयार केला असून, तो लवकरच कोणत्या देशाच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर झळकणार आहे?
== थायलंड
३४) राज्यातील कुठल्याही नागरिकाचे शासकीय कार्यालयामधील काम विशिष्ट वेळेत झाले पाहिजे, यासाठी सेवा अधिकार कायदा (राइट टू सर्व्हिस) लागू करू शकणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य ठरणार आहे?
== पहिले
३५) एका सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या माहितीनुसार १६-३० वयोगटातील तरुणीमध्ये आणि ३१-६० वयोगटातील पुरुषांमध्ये कोणत्या व्हिटॅमिनची कमतरता आढळून आली आहे?
== व्हिटॅमिन D
३६) राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खाते (एसीबी) माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेबाहेर (आरटीआय) राहील, हा सामान्य प्रशासन विभागाचा आदेश कोणी रद्द केला आहे?
== राज्यपाल सी. विद्यासागर राव
३७) ‘व्यवसाय करण्यास सोपे’ या निकषावर जागतिक बँकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार १८९ देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
== १४२
३८) ‘व्यवसाय करण्यास सोपे’ या निकषावर जागतिक बँकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार १८९ देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणारा देश कोणता?
== सिंगापूर
३९) इराकमधील इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सिरियाला (इसिस) सामील होण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरला (मुनव्वर सलमान) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तो कोणत्या कंपनीचा माजी कर्मचारी होता?
== गुगल
४०) मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील सिडनी डो व त्यांच्या सहकार्यानी कॅनडातील टोरंटो येथील आंतरराष्ट्रीय अंतराळविषयक परिषदेत मांडलेल्या मतानुसार मंगळावर गेल्यापासून माणूस फक्त किती दिवस जगू शकेल, असा इशाराही दिला आहे?
== ६८
४१) विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्लूएफ) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत टॉप फाईव्हमध्ये एंट्री करणारा/री खेळाडू कोण?
== सायना नेहवाल
४२) ग्राहकांना आता एटीएममधून एका महिन्यात जास्तीत जास्त किती वेळा पैसे काढता येणे किंवा खात्यातील शिल्लक तपासणे शक्यर होणार आहे. व त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर २० रुपये आकारले जाणार आहेत?
== ५ वेळा
४३) ग्राहकांना आता दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा महिन्यात केवळ किती वेळा वापरता येणार आहे.
== ३ वेळा
४४) मानधनाच्या मुद्द्यावरून वेस्ट इंडीजचा क्रिकेट संघ भारत दौरा अर्धवट सोडून गेल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाकडे (डब्लूआयसीबी) किती कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे?
== २५० कोटी
४५) कर्नाटकमधील बेळगावसह बारा शहरांच्या नावांचे नामांतर कोणत्या तारखेपासून होत आहे?
== ०१ नोव्हेंबर २०१४
४६) कर्नाटकमधील बेळगावसह बारा शहरांच्या नावांचे नामांतर केंद्र सरकारतर्फे कधी परवानगी देण्यात आली आहे?
== १७ ऑक्टोबर २०१४
४७) जागतिक पातळीवरील चारचाकी गाड्यांच्या सुरक्षेची पाहणी करणाऱ्या संस्थेच्या पाहणीमध्ये ‘क्रॅश टेस्ट‘मध्ये मारुती मारुती सुझुकी च्या कोणत्या दोन गाड्या सुरक्षेच्या निकषांवर नापास झाल्या आहेत?
== स्विफ्ट आणि दॅट्‌सन गो
४८) जागतिक आरोग्य संघटनेच्या गेल्या वर्षीच्या अहवालानुसार जगभरात रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या दर दहा जणांमधील किती व्यक्ती भारतीय असतात?
== ०१
४९) कमी उंचीवरुन उडणाऱ्या ड्रोन विमानांना लक्ष्य करु शकणारी लेझर स्वरुपामधील स्वदेशी बनावटीची संरक्षणात्मक प्रणाली तयार करण्यात नुकतेच कोणत्या देशाला यश आले आहे?
== चीन
५०) मलेरिया, डायरिया आणि निमोनिया अशा विविध आजारांविरोधात लढा देण्यासाठी बिल गेट्स विकनसशील देशांना किती कोटी डॉलर्सची मदत करणार आहेत?
== ५० कोटी डॉलर्स
५१) व्हॉलिबॉलचा सामना बघायला गेली म्हणून कोणत्या देशातील एका तरुणीला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे?
== इराण(तेहरान)
५२) नुकतेच निधन झालेले अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा पहिलाच हिंदी चित्रपट कोणता या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता?
== अर्धसत्य 
५३) सदाशिव अमरापूरकर यांना कोणत्या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार मिळाला होता?
== सडक
५४) 'आमरस' या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारे अभिनेते कोण?
== सदाशिव अमरापूरकर
५५) सध्या १९७१च्या गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार, व्यंग किंवा जिवाला धोका असलेल्या गर्भाचा गर्भपात करण्यासाठी २० आठवड्यांपर्यंतची मुदत आहे.पण ही मुदत किती आठवड्यांपर्यंत वाढविण्यासाठी मसुदा केंद्रीय आरोग्य मंत्रिमंडळाने बनवला आहे?
== २४ आठवडे
५६) डॉ. नीरज देव यांनी कोणाची पुण्यतिथी ‘देशभक्ती दिन’ म्हणून साजरा करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे?
== स्वातंत्र्यवीर सावरकर
५७) नाना गोखले यांचे वयाच्या १०३ व्या वर्षी निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
== चित्रकार
५८) देशभरात डेंग्यू वेगाने फैलावत असतानाच कोणत्या देशातील सॅनोफी पाश्चर या औषध कंपनीने तयार केलेली डेंग्यूवरील लशीची भारतातील चाचणी यशस्वी ठरली आहे?
== फ्रान्स
५९) नुकतेच कोणत्या देशाचे मानवविरहित चांद्रयान यशस्वीरीत्या पृथ्वीवर उतरले आहे.अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा देश आहे?
== चीन
६०) विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असलेल्या झारखंडमध्ये काँग्रेसने कोणत्या पक्षासोबत असलेली युती तोडली आहे?
== झारखंड मुक्ती मोर्चा
६१) येल व ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे राबविण्यात आलेल्या मोहिमेत पृथ्वीपासून २३०० प्रकाश वर्षे अंतरावरील कमी वस्तुमान व घनता असणारा नवा ग्रह शास्त्रज्ञांना सापडला असून, त्यावरील वातावरणात हायड्रोजन व हेलियम हे वायू आहेत.या ग्रहाचे नाव काय ठेवण्यात आले आहे?
== पीएच ३
६२) केवळ ५६ चेंडूंमध्ये शतक झळकावीत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान शतक ठोकणाऱ्या विव्ह रिचर्डसच्या विक्रमाची बरोबरी करणारा खेळाडू कोण?
== मिसबाह उल-हक
६३) डॉ. अजय राजाध्यक्ष या मराठी अर्थतज्ज्ञाची कोणत्या देशाच्या ट्रेझरी बॉरोईंग अॅडव्हायझरी कमिटीमध्ये (टीबीएससी) नियुक्ती झाली आहे?
== अमेरिका
६४) ट्रायबल कल्चरल सोसायटीची स्थापना करून झारखंड, ओरिसा, आसाम, बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या संताली आणि हो भाषांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने कोणत्या कंपनीने प्रकल्प हाती घेतला होता?
== टाटा स्टील
६५) डिसेंबर २०१४ मध्ये 'इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज' या संस्थेची हवामान बदलांवर बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?
== लिमा,पेरू
६६) भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्त्रो’ ‘चंद्रयान-२’ आणि ‘मंगळयान-२’ ही मोहीम कधी राबविणार आहे?
== २०१६ आणि २०१८
६७) 'प्लेइंग इट माय वे' कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे?
== सचिन तेंडूलकर
६८) आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा संघ कोणता?
== दक्षिण आफ्रिका
६९) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान अर्धशतकाचा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर जमा झाला आहे?
== मिसबाह उल हक
७०) अमेरिकन ग्रां. प्रि. शर्यतीचे जेतेपद पटकावून सलग पाचव्या आणि या मोसमातील १०व्या जेतेपदाला गवसणी घालणारा खेळाडू कोण?
== लुइस हॅमिल्टन
७१) आगामी सीएट चषक निमंत्रित सुपरक्रॉस लीगसाठी डीएसके रेसिंग संघाने सर्वाधिक एक लाख १० हजार रुपयांची बोली लावत कोणत्या खेळाडूस विकत घेतले आहे?
== प्रमोद जोशुआ
७२) आयपीएलच्या सहाव्या हंगामात झालेल्या सट्टेबाजी आणि स्पॉट-फिक्सिंग प्रकरणासाठी नेमण्यात आलेल्या मुद्गल समितीने आपला अंतिम चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला आहे. या अहवालामध्ये आयसीसीचे कार्यकारी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या सेओबत किती क्रिकेटपटूंविरोधात आरोप करण्यात आले आहेत?
== १२
७३) आर्थिक विकासाच्या दरात आणखी नेमकेपणा आणण्यासाठी कोणते नवे आधारभूत वर्ष ठरविण्यात आले आहे?
== २०११-१२
७४) १ मे २०१६ पासून किरकोळ बाजारातील चलनवाढीचा निर्देशांक (सीपीआय), घाऊक बाजारातील चलनवाढीचा निर्देशांक (डब्ल्यूपीआय) आणि औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (आयआयपी) या तीन महागाई आणि औद्योगिक विकासातील वाढ तपासणाऱ्या निर्देशांकांसाठीही कोणते नवे आधारभूत वर्ष ठरविण्यात आले आहे?
== २०१४-१५
७५) अर्थमंत्रालयाची 'थिंक टँक' मानल्या जाणा‍ऱ्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी'च्या (एनआयपीएफपी) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
== विजय केळकर
७६) भारतात २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून इंटरनॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग सिस्टमची (आयएफआरएस) अंमबजावणी सुरू होत असून या पार्श्वभूमीवर, चार्टर्ड अकाउंटंट्सच्या (सीए) अभ्यासक्रम कोणत्या वर्षापासून बदलण्यात येणार आहे?
== २०१६
७७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बांधकाम क्षेत्रात किती हजार चौरस मीटर चटई क्षेत्रफळापर्यंत थेट विदेशी गुंतवणुकीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे?
== २० हजार चौरस मीटर
७८) 'सीवायडी-टीडीव्ही' ही कोणत्या रोगावरील/आजारावरील प्रतिबंधक लस आहे?
== डेंग्यू 
७९) ‘ब्लॅक आउट’ संकटामुळे चर्चेत असलेला देश कोणता?
== बांगलादेश
८०) मुंबई उच्च न्यायालयाने तसेच सुप्रीम कोर्टाने किती वर्षाखालील मुलांना दहीहंडीच्या थरांमध्ये सहभागी करून घेण्यास निर्बंधघातले आहे?
== १८
८१) भारत-जपान संबंधात मोठी प्रगती केल्याबद्दल 'ग्रँड कॉर्डन ऑफ द ऑर्डर ऑफ द पॉलोवनिया फ्लॉवर्स' हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात येणार आहे?
== मनमोहन सिंग
८२) बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची शिफारस कोणते राज्य केंद्र सरकार कडे करणार आहे?
== कर्नाटक
८३) भारतातील प्राणिसंग्रहालये व दक्षिण आशियातील प्राणिसंग्रहालये यांची वैज्ञानिक पद्धतीने देखभाल करण्यासाठी केंद्र सरकार प्राणिसंग्रहालय केंद्र स्थापन करणार आहे.हे केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे?
== दिल्ली
८४) विधवांचे शहर म्हणून ओळखले जाणारे 'बिढोबा पाली’ हे शहर कोणत्या देशात आहे?
== बांगलादेश
८५) सुखोई-३० विमानांच्या तांत्रिक तपासणीसाठी कोणत्या देशाचे दहा तज्ज्ञांचे पथक पुण्यात दाखल झाले आहे?
== रशिया
८६) आठ महिन्यांच्या राजकीय अनिश्चिततेनंतर अखेर दिल्ली विधानसभा कधी बरखास्त करण्यात आली?
== ०४ नोव्हेंबर २०१४
८७) कोट्यवधी रुपयांच्या चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीबीआय) बीजू जनता दलाचे (बीजेडी) खासदार रामचंद्रा हंसदा यांच्यासह कोणत्या दोन आमदारांना अटक केली आहे?
== सुबरना नाऐक आणि हितेश बागारती
८८) जगप्रसिद्ध अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचे कोणत्या देशात असलेले स्मारक उद्ध्वस्त करण्यात आले आहे?
== रशिया(सेंट पीटर्सबर्ग)
८९) आयफोनच्या स्वरूपातील ६ फूट उंचीचे स्टीव्ह जॉब्ज यांचे स्मारक जानेवारी २०१३ मध्ये रशियातील कोणत्या उद्योग समूहातर्फे उभारण्यात आले होते?
== झेफ्स कंपनी
९०)सध्या अॅपलच्या सीईओपदी कोणती व्यक्ती विराजमान आहे?
== टीम कुक
९१) केतन मेहता दिग्दर्शित राजा रवी वर्मा यांचे आयुष्य कथन करणारा 'रंग रसिया' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर कोणत्या न्यायालयाने बंदी घातली आहे?
== केरळ न्यायालय
९२) कालबाह्य कायदे व समित्या संपुष्टात आणण्याच्या सरकारच्या धोरणांतर्गत केंद्रीय अन्नधान्य मंत्रालयाने ५६ वर्षे जुनी असलेली कोणती विकास परिषद संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे?
== साखर उद्योग विकास परिषद अर्थात डीसीएसआय
९३) इंटरनेटवर प्रादेशिक भाषेतून माहिती उपलब्ध करून देण्यासाठी काही वृत्तसंस्थांसह सरकारी संस्था सी-डॅकसोबत कोणत्या कंपनीने करार केला आहे?
== गुगल
९४) पर्यटकांना अवकाशात घेऊन जाण्याची मोहीम आखणाऱ्या कोणत्या कंपनीचे अवकाशयान नुकतेच कॅलिफोर्निया येथे चाचणीदरम्यान कोसळले?
== व्हर्जिन
९५) पाकिस्तानविरुद्ध १९७१ मध्ये पुकारण्यात आलेल्या स्वातंत्र्य युद्धातील युद्ध गुन्ह्यांबाबत बांगलादेशातील विशेष लवादाने "जमाते इस्लामी‘ या मूलतत्त्ववादी संघटनेचा प्रमुख असलेल्या कोणत्या व्यक्तीस दोषी ठरवीत फाशीची शिक्षा ठोठावली आहे?
== मतिऊर रहेमान निजामी
९६) राष्ट्रध्वज बदलण्यासाठी कोणत्या देशातील सरकारकडून २०१६ मध्ये सार्वजनिक मतचाचणी घेण्यात येणार आहे?
== न्यूझीलंड
९७) इंटरनेटच्या वापरावर २०१५ पासून कर आकारण्याचा निर्णय कोणत्या देशाच्या सरकारने जाहीर केल्यानंतर येथील हजारो नागरिकांनी या निर्णयाविरुद्ध निदर्शने केली?
== हंगेरी
९८) नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या कसोटी क्रिकेट अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर असलेला खेळाडू कोण?
== आर. अश्विलन; फलंदाजीत कुमार संगकारा आणि गोलंदाजीत डेल स्टेन अव्वल स्थानावर
९९) पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा सर्बियाच्या खेळाडू कोण?
== नोव्हाक जोकोविच
१००) जपानच्या दिशेने येणारे ‘या वर्षातील सर्वात भयंकर’ अशी गणना करण्यात आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय आहे?
== नूरी (Cyclone Nuri)

Popular posts from this blog

चुंबकाचे गुणधर्म

खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

भारतातील सर्वात मोठे