राष्ट्रपतीवर महाभियोग

राष्ट्रपतीवर महाभियोग

१) _राष्ट्रपतीने घटनेच भंग केला असेल किंवा घटनाविरोशी कृत्य केले असेल तर त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार संसदेला आहे._

२) *राष्ट्रपतीवर महाभियोग प्रक्रिया 61 व्या कलमात* संगीतलेली आहे.

३) _संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात राष्ट्रपतीने घटना भंग केल्याचा ठराव प्रथम मांडावा लागतो._

४) हा ठराव लोकस्वरुपाचा असावा लागतो व *सभागृहातील किमान 1/4 (25%) सभासदांची त्याला संमती असावी लागते.*

५) ठराव मांडण्यापूर्वी *राष्ट्रपतीला आरोपासंबंधी 14 दिवस अगोदरची सूचना* द्यावी लागते.

६) या ठरावावर *सभागृहात चर्चा होऊन सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने तो ठराव मंजूर झाला पाहिजे* आरोप बहुमताने सिद्ध न झाल्यास तो ठराव तेथेच रद्द होतो.

७) _एक सभागृहाने आरोपपात्र ठेवल्यानंतर दुसर्‍या सभागृहात त्याची चौकशी होते. सभागृहातील चर्चेच्या वेळी स्वत: किंवा आपल्या प्रतींनिधीमार्फत आपली बाजू मांडू शकतो तसा घटनेत राष्ट्रपतीला अधिकार आहे._

८) _दुसर्‍या सभागृहाने एकुण सभासदाच्या_ *2/3 बहुमताने आरोप सिद्ध केल्यास* त्या दिवसापासून *राष्ट्रपती* पदच्युत होतात.c

Popular posts from this blog

चुंबकाचे गुणधर्म

. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे