सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले
निकड.. नव्या दमाच्या सत्यशोधकाची! महात्मा जोतिराव फुले यांच्या शतकोत्तर रौप्य स्मृतिवर्षांरंभानिमित्त त्यांच्या वैचारिक आणि कृतीप्रधान वारशाची आज नेमकी काय स्थिती आहे, यावर क्ष-किरण टाकणारा लेख.. २८नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा जोतिराव फुल्यांचे निधन झाले. पुढील वर्षी या घटनेला १२५ वर्षे पूर्ण होतील. यानिमित्ताने अनेक कार्यक्रम होतील. महाराष्ट्राच्या खेडोपाडय़ांत महात्मा फुल्यांची सत्यशोधक चळवळ पोहोचली.. पसरली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात या चळवळीचा प्रवेश झाला. त्यातून समाजात प्रचलित ब्राह्मण्यावर, जातिव्यवस्थेवर, स्त्री-पुरुष भेदाभेदावर, अस्पृश्यतेवर हल्ले झाले. तत्कालीन राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीला मूलभूत मानवी स्वातंत्र्याचा आयाम मिळाला. १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली. फुल्यांनी मात्र या घटनेचे स्वागत केले नाही. उलट, जाहीर शंका उपस्थित केली. सामाजिक lr07गुलामगिरीचा प्रश्न मांडला. २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. ७३-७४ सालातच राजर्षी शाहू व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जन्मदिन येतात. फुले १८९० साली गेले. १४ एप्रिल १८९१ रोजी डॉ...