प्रसाद बसवेश्वर चौगुलेउपजिल्हाधिकारी (MPSC २०१९)

Tips for MPSC Preparation  by Topper Mr.Prasad Chougule...
नमस्कार मित्रांनो, 
     खूप साऱ्या विदयार्थी मित्रांचे फोन कॉल व मेसेज येत आहेत की सध्याच्या परिस्थिती मध्ये नक्की काय strategy असावी.त्यातील काही शंकांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न... 

     २०२० हे वर्ष मावळतीकडे जात आहे. खास करून स्पर्धा परीक्षा करण्याऱ्या मित्रमैत्रिणीनसाठी तर हे वर्ष निराशाजनक च म्हणावे लागेल. राज्यसेवा आणि PSI 2019 चा निकाल आणि AMVI Pre exam सोडून इतर कोणतीही घटना परीक्षार्थीच्या दृष्टीने झाली नाही. जीव ओतून अभ्यास करून देखील जर परीक्षा होत नसेल आणि कधी होईल याची शाश्वती नसेल तर ते एक uncertain वातावरण तयार करते.

      Charles Darwin चा " Survival of the Fittest" चा सिद्धांत सर्वांनी अभ्यासला आहे. तो सध्याच्या परिस्थितीत खूप relevant आहे. जो स्वतःला बदलेल्या परिस्थितीनुसार Adjust करून घेईल तोच या survival च्या race मध्ये टिकून राहील. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील स्वतःला परिस्थितीनुसार बदलले पाहिजे. 

       पूर्व परीक्षेची तारीख चार ते पाच वेळा पुढे ढकलल्यामुळे काही विद्यार्थी वर्षभर फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करत आहेत व सध्या परीक्षा कधी होईल याची खात्री नसल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची मरगळ आली आहे. पण आता ही परीक्षा temperament ची आहे. जो स्वतःला mentally stable ठेवून परीक्षेच्या तारखेची वाट न पाहता जोमाने अभ्यास करेल त्याचे pass होण्याचे chances जास्त आहेत. यासाठी काही मार्गदर्शनपर मुद्दे खालील लेखात मांडत आहे.

१) सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचा एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक चा अभ्यास आहे त्यांनी सद्यस्थितीत Mains च्या अभ्यासक्रमावर फोकस केला पाहिजे. काही important टॉपिक जे आपण सध्या कव्हर करू शकतो ते खालील प्रमाणे..

𝐆𝐒 𝟏
इतिहास- पूर्व परीक्षेच्या अभ्यासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास तुम्ही वाचला असेल. Mains च्या दृष्टीने तुम्ही खालील टॉपिक कव्हर करू शकता

I) महाराष्ट्राचा इतिहास- ११ वि स्टेट बोर्ड + गाठाळ सर
II) स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास- बिपिन चंद्रा टॉपिक wise OR 12th NCERT India since independence 
हा टॉपिक GS 1 मध्ये १२ -१४ marks la व GS 2 मध्ये पक्ष आणि दबावगट या टॉपिक मध्ये ४-५ मार्क्सला विचारला जातो. त्याच्या नोट्स काढून ठेवणे उत्तम आहे.

भूगोल - हा मधील सर्वाधिक मार्क देणारा विषय आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राचा भूगोल चा अभ्यास तुम्ही आता करू शकता.
I) महाराष्ट्राचा भूगोल- सवदी सर ( map reading is very important here)
II) Remote sensing- मी ज्या pdf च्या नोट्स काढल्या होत्या त्याची लिंक शेअर करत आहे. Syllabus प्रमाणे तुम्ही देखील त्या पाहू शकता व नोट्स काढू शकता.
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://nptel.ac.in/courses/105/108/105108077/&ved=2ahUKEwj5p5b9xdTtAhX5wjgGHSDfAkwQFjABegQIAhAB&usg=AOvVaw170lhY_r33qQwY3SQTffzW&cshid=1608192197064

Agriculture-
हा syllabus चा static part आहे. नॉन अग्री background chya मुलांनी आता एकदा कंटेंट वाचून notes काढून ठेवल्या तर mains साठी उपयोगी आहे.
• 11 th and 12 th State Board book- selected topic syllabus wise
• Arun Katyayan book
• हरी सरोदे सरांच्या नोट्स देखील उत्तम Revision sathi (Telegram vr search kara)

𝐆𝐒 𝟐
• यामधील कायदे हा घटक सोडून इतर सर्व घटक तुम्ही आता वाचून घेऊ शकता व त्यांच्या नोट्स काढू शकता.
• यामध्ये पक्ष आणि दबावगट, निवडणूका, अखिल भारतीय सेवा, जिल्हा आणि राज्य प्रशासन, पंचायत राज यासारखे polity २ चे घटक कव्हर करू शकता.
• या टॉपिक साठी तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता यामध्ये election commissionची वेबसाईट, राष्ट्रीय राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांची विकिपीडिया पेजेस, LBSNAA, SVPNPA etc यांच्या वेबसाईट बघू शकता.
• M Laxmikant यांचे governance in India हे पुस्तक देखील अत्यंत उपयोगी आहे. (Topic 3 to 8)
• GS 2 हा विषय खूप जास्त मार्क मिळवून देणारा विषय आहे जेवढा syllabus तुम्ही आत्ता cover कराल तेवढा तुम्हाला mains साठी फायदा होईल.

𝐆𝐒 𝟑
माझे वैयक्तिक मत असे आहे की HR & HRD, पूर्व परीक्षेनंतर अभ्यासलेला जास्त चांगला आहे कारण यामध्ये खूप जास्त factual data विचारला जातो.
तरी तुम्ही किरण दिसले सरांच्या development या बुक ची रिविजन करू शकता. हे पुस्तक तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे.

𝐆𝐒 𝟒
Economics आजचा पेपर खूप जणांना अवघड वाटतो. तुम्ही आताच्या काळामध्ये इकॉनॉमिक्स च्या कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होईल.
• यासाठी Mrunal patel यांची You tube वरील व्हिडिओ series syllabus प्रमाणे बघू शकता.
• Economics चे mains sathi important असणारे topic जसे की सार्वजनिक वित्त व खर्च, आंतरराष्ट्रीय व्यापार, सहकार ,उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी अर्थशास्त्र यासारखे टॉपिक कव्हर करून त्याच्या नोट्स काढू शकता.
• यासाठी किरण देसले सरांचे (economics 1) हे पुस्तक उत्तम आहे.
• कृषी अर्थशास्त्र साठी vikaspedia website useful ahe.( Notes kadha)

       वर दिलेल्या टॉपिक्स पैकी तुम्हाला जेवढे टॉपिक्स कव्हर करता येतील तेवढे करा. Syllabus चे कोणतेही बर्डन घेऊ नका कारण जेवढा syllabus तुम्ही आता cover  करणार आहे तो तुमच्यासाठी advantage असेल. आणि जेव्हा पूर्व परीक्षेची तारीख declare होईल तेव्हा तुम्ही पूर्णवेळ पूर्वपरीक्षेसाठी देऊ शकता. जेणेकरून तुमचा आता तुमचा mains साठी चा maximum syallabus कव्हर होईल.

• ज्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेची थोडी भीती वाटत आहे त्यांनी दिवसातला 30 टक्के वेळ पूर्व परीक्षेसाठी देऊन इतर वेळामध्ये मुख्य परीक्षेची तयारी करू शकता. यामध्ये तुम्ही CSAT व GS तुमच्या convenience नुसार divide करू शकता.
• माझे वैयक्तिक मत असे आहे की gs2 व gs4 चा जेवढा maximum syllabus cover करता येईल तेवढा करून घ्यावा कारण हे स्कोरिंग subject आहेत.
• तुम्ही मराठी किंवा इंग्लिश objective साठी ही आता prepare करू शकता.यामध्ये दिवसातला एक ते दीड तास देणे अपेक्षित आहे. Objective grammar चा अभ्यास डेली बेसिस वर केलेला जास्त फायदेशीर ठरतो.
• ज्या विद्यार्थ्यांनी लॉक डाऊन मध्ये अभ्यासाची सुरुवात केली आहे त्यांनी बेसिक पुस्तके कव्हर करण्यावर भर द्यावा यामध्ये स्टेट बोर्ड ची पुस्तके एनसीईआरटी त्यासोबत Standard reference book che reading करून understanding वर भर द्यावा सोबत previous year question देखील व्यवस्थित करून घ्यावे.

यशाचा कोणताही फिक्स असा राजमार्ग नाहीये. प्रत्येकाच्या अभ्यासाची पद्धत वेगळी असते. तुम्हाला जे सूट होईल त्यानुसार तुमचा प्लॅन रेडी असू दे. तुम्ही त्यामध्ये वैयक्तिक पातळीवर बदल देखील करू शकता.

मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है,
आप कोशिश भी ना करे ये तो गलत बात है....!

𝗔𝗹𝗹 𝘁𝗵𝗲 𝘃𝗲𝗿𝘆 𝗯𝗲𝘀𝘁 𝗳𝗼𝗿 𝘆𝗼𝘂𝗿 𝗯𝗿𝗶𝗴𝗵𝘁 𝗳𝘂𝘁𝘂𝗿𝗲.....

प्रसाद बसवेश्वर चौगुले
उपजिल्हाधिकारी (MPSC २०१९)

Popular posts from this blog

चुंबकाचे गुणधर्म

खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

भारतातील सर्वात मोठे